जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३०३६ वर; ११६१ रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोनाबाधित रुग्णाची संख्या तीन हजार पार झाली आहे. आज दिवसभरात १०४ रुग्णांची भर पडली. त्यामुळे आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ हजार ३६ वर जाऊन पोहचली आहे.
औरंगाबाद मध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे सर्वत्र चिंता वाढत चालली आहे. आज कालच्या प्रमाणे आज दिवसभरात देखील शंभरच्या वर रुग्ण आढळून आले आहेत. आज दिवसभरात १०४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३०३६ वर जाऊन पोहचली आहे. त्यापैकी आतापर्यंत १७०९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर सध्या ११६१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
या भागातील आढळेल १०४ रुग्ण
आज दिवसभरात १०४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात राजीव नगर-१, समता नगर -२, पेंशनपुरा-१, भवानी नगर -१, रेहमानिया कॉलनी -२, मसून नगर-१, पळशी -२,एन आठ सिडको -५, पुष्प गार्डन -१, गजानन नगर-१, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर-१, सेव्हन हिल-१, हडको -१, एसआरपीएफ कॉलनी-२, जटवाडा रोड -१, बीडबायपास-१, नारेगाव -३, जयभवानी नगर-२, ठाकरे नगर-१, न्यू एसटी कॉलनी, एन दोन सिडको-१, मनजीत नगर-१ , एन नऊ सिडको-३, जुनी मुकुंदवाडी,विठ्ठल मंदिर जवळ -२, शंभू नगर, गारखेडा-१, न्यू विशाल नगर -५, ब्रिजवाडी-१, शहानूरवाडी -१, यशोधरा कॉलनी -१, गुलमंडी -१, पद्मपुरा-१, नागेश्वरवाडी-२, उस्मानपुरा-१, शिवशंकर कॉलनी-१, बेरी बाग-१, राजनगर -१, उत्तम नगर-१, जवाहर कॉलनी-१, ज्योती नगर -१, समर्थ नगर -१०, सिडको -१, हनुमान नगर -१, सातारा परिसर-१, रमा नगर-२, विश्रांती नगर -३, सिडको वाळूज महानगर दोन-२, बजाज नगर, गुलमोहर कॉलनी -२, शिवाजी नगर -३, न्यू हनुमान नगर -२, गारखेडा-२ , मयूर नगर-१, राहुल नगर -१, बजाज नगर -१, संभाजी कॉलनी-१, संजय नगर -१, आयोध्या नगर,सिडको -१, मोतीवाला नगर-१, औरंगपुरा -१, इतर -१, विश्वभारती कॉलनी-१, रांजणगाव, शेणपूजी -१, चिकलठाणा-१, गौतमी अपार्टमेंट-१, प्रताप नगर -१, वडगाव कोल्हाटी-१, बुढीलेन-१, रोशन गेट -१, बायजीपुरा-१, या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये ४० स्त्री व ६४ पुरूष रुग्णांचा समावेश आहे.
घाटीत दोन, खासगीत दोन कोरोनाबाधिताचा मृत्यू
शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील ६० वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच औरंगाबाद शहरातील बायजीपुरा गल्ली क्रमांक -२७ येथील ७५ वर्षीय पुरूष रुग्णाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने घाटीत आतापर्यंत १२२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १२१ मृत्यू औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. तसेच शहरातील खासगी रुग्णालयात कटकट गेट येथील ६५ वर्षीय स्त्री आणि अन्य एका खासगी दवाखान्यात श्रीराम नगराजवळील विश्वभारती कॉलनीतील ५६ वर्षीय स्त्री रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत घाटीत औरंगाबाद जिल्ह्यातील १२१, औरंगाबाद शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये एकूण ४४, मिनी घाटीमध्ये १ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण १६६ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.